Wednesday, July 18, 2012

एकरी चार क्विंटल उत्पादन वाठले नऊ क्विंटलपर्यंत

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांसाठी एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा लाभ देण्यात येतो. त्यामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रकल्प विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व दहा जिल्ह्यांत (कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार) राबविण्यात येत आहे. त्यात धुळे येथील कृषी महाविद्यालयाच्या विभागीय विस्तार केंद्रातर्फे नंदुरबार जिल्ह्यात मागील रब्बीत (2011-12) हरभरा पिकाविषयीचा (दिग्विजय वाण) प्रकल्प राबवण्यात आला. यात सुंदरदे, करणखेडा, फुलसरे, बद्रिझिरा आदी नंदुरबार तालुक्‍यातील गावसमूहातील एकूण 50 शेतकऱ्यांची (लाभार्थी) निवड नंदुरबारच्या कृषी विभागातर्फे करण्यात आली. लाभार्थी शेतकऱ्यांना एक एकर क्षेत्रासाठी 100 टक्के अनुदानावर आवश्‍यक निविष्ठा पुरविण्यात आल्या. लागवडीपूर्वी सर्व शेतकऱ्यांचे शेतातील मातीचे नमुने तपासून देण्यात आले. त्यामध्ये नत्र, स्फुरद तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी आढळून आले. 48 टक्के माती नमुन्यांत लोह व जस्ताची कमतरता दिसून आली.
 
लागवडीतील निविष्ठा म्हणून 30 किलो हरभरा (दिग्विजय) बियाणे, बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम, स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत, ट्रायकोडर्मा आदींचा पुरवठा करण्यात आला. त्याचबरोबर डीएपी, झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, फवारणीसाठी 13-0-45 यांचेही वाटप करण्यात आले. एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे, अझाडिरॅक्‍टीन (कडुनिंबयुक्त कीटकनाशक), क्‍लोरपायरिफॉस, सायपरमेथ्रिन (20 ईसी) यांचाही पुरवठा वेळेत करण्यात आला. प्रकल्पाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. शिवाजीराव पोखरकर (सेवानिवृत्त), तसेच डॉ. हरी मोरे यांचे मार्गदर्शन मिळाले. लागवड प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यासाठी तंत्रज्ञान सूत्रे तयार करण्यात येऊन शेतकऱ्यांना त्यांचा वापर करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. 
प्रशिक्षण आणि शिवारफेरी 

सुंदरदे येथील कमलेश परदेशी यांच्याकडे सरी-वरंबा पद्धतीने हरभरा बियाणे लावण टोकण पद्धतीने करण्यात आली. बीजप्रक्रिया व प्रत्यक्ष टोकण कशी करावी, याचे मार्गदर्शन विभागीय विस्तार केंद्राचे (धुळे) डॉ. मुरलीधर महाजन आणि नंदुरबारचे कृषी उपसंचालक के. डी. महाजन यांनी केले. सुंदरदे येथे लाभार्थी शेतकऱ्यांसाठी "हरभरा एकात्मिक पीक व्यवस्थापन' विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. नंदुरबारलाही कृषी विभागाच्या प्रतिनिधींना असे प्रशिक्षण देण्यात आले. प्रबोधनासाठी करणखेडा येथे शिवारफेरीही आयोजित करण्यात आली. यात नंदुरबारच्या जीवन देवरे यांनी सेंद्रिय पद्धतीने हरभरा लागवड करण्याविषयी मार्गदर्शन केले. 
 
देवरे यांना मिळाला एकरी 14 क्विंटल हरभरा 

माझ्याकडे 20 गाई आहेत, त्यामुळे शेणखत उपलब्ध होते. रासायनिक खतांचा अजिबात वापर करीत नाही. पीक संरक्षणात गोमूत्र, कडुनिंब, दशपर्णी अर्क यांचा वापर करतो. एकरी 14 क्विंटलपर्यंत हरभऱ्याचे उत्पादन मिळाले. 
शास्त्रज्ञांचा सल्ला, त्याचबरोबर हरभरा पिकाचे केलेले योग्य व्यवस्थापन याचा उत्पादनवाढीला फायदा झाला. 
जीवन तानका देवरे - 9922420381 

प्रा. अविनाश कौलगे - 9881329539 
शास्त्रोक्त पद्धतीच्या वापराने एकरी 11 क्विंटल उत्पादन