Horticultural Research Institute, Agricultural Research Center , Egypt .
Pomology department, National Research Centre, Egypt .
प्रयोगाचा उद्देश –
केळी घडावरिल कमळफुलाचे (पुलिंगी फुले) घडावरुन काढुन टाकणे तसेच जी.ए. 3 च्या फवारण्या याचा फळाच्या वजन, आकार, रंग, गोलाई, लांबी तसेच फळ काढणी वर होणारा परिणाम तपासणे.
प्रयोगाचे स्वरुप –
केळी पिकातील फुलोरा ज्यास विविध प्रांतांत वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते (घड, लुम इ.), त्याच्या येण्यानंतर त्यास जे घडाच्या तळाशी पुलिंगी फुले असतात, (बहुदा करुन ज्यास कमळफुल म्हणुन ओळखले जाते) ते काढण्या आधी व काढल्या नंतर 1 महिन्यांनी जी.ए.3 चे 100 पीपीएम व 200 पीपीएम च्या घडावर फवारण्यास घेण्यात आल्यात.
केळी पिकाची जात ग्रॅन्ड नैन होती, तसेच लागवड 3.5 मीटर बाय 3.5 मीटर अंतरावर फ्लड पाण्यावर करण्यात आली.
हा प्रयोग करतांना खालिल प्रमाणे ट्रिटमेंट करण्यात आल्यात, खालिल प्रमाणेच जी.ए. चे प्रमाण असलेली दुसरी फवारणी 1 महिन्याने घेण्यात आली.
1. कंट्रोल ज्यात घडावर कमळफुल असतांना केवळ पाणी फवारण्यात आले.
2. कंट्रोल ज्यात घडावरील कमळफुल काढल्यानंतर केवळ पाणी फवारण्यात आले.
3. जी.ए.3 100 पीपीपएम ची घडावर घडावरील शेवटची फणी उमलल्यावर लागलीच कमळफुल असतांना फवारणी.
4. जी.ए.3 200 पीपीएम ची घडावर घडावरील शेवटची फणी उमलल्यावर लागलीच कमळफुल असतांना फवारणी.
5. जी.ए.3 100 पीपीएम ची घडावरिल शेवटची फणी उमलल्यावर लागलीच कमळफुल काढल्यानंतर फवारणी.
6. जी.ए.3 200 पीपीएम ची घडावरिल शेवटची फणी उमलल्यावर लागलीच कमळफुल काढल्यानंतर फवारणी.
प्रत्येक रोपास सारखेच खत व पाणी देण्यात आले.
महत्वाचे - तसेच जी.ए.3 ची पहिली फवारणी घडावरील शेवटची फणी उमलल्यावर लागलीच घेण्यात आली.
प्रयोगाचे निर्कष –
1. केळी वरिल घडाचे कमळफुल काढल्यास घड लवकर तयार होतात.
2. जी.ए. 3 ची फवारणी 200 पीपीएम ने घडावरील शेवटची फणी उमलल्यावर लागलीच कमळफुल काढल्यानंतर लागलीच आणि त्यानंतर 1 महिन्यांनी घेतल्यास केळीच्या वजनात, आकारत आणि घड लवकर तयार होण्यात फायदेशिर दिसुन आली. जी.ए. 3 ची 100 पीपीएम पेक्षा 200 पीपीएम ची फवारणी जास्त फायदेशिर ठरते.
संदर्भ –
टॅडोर्स, चट्टोपाध्याय आणि जाना, दिनेश आणि रेड्डी, प्रधान, सामरा आणि हेमिद.
ट्रिटमेंट ( खालिल प्रमाणेच दुसरी फवारणी 1 महिन्याने केलेली आहे) | फळ तयार होण्यास लागलेले दिवस | घडाचे वजन (किलो) | एका फळाचे वजन (ग्रॅम) | |||
पहिला हंगाम | दुसरा हंगाम | पहिला हंगाम | दुसरा हंगाम | पहिला हंगाम | दुसरा हंगाम | |
कंट्रोल कमळफुल असतांना | 135 | 135 | 21.0 | 23.5 | 145 | 162 |
कंट्रोल कमळफुल नसतांना | 125 | 124 | 24.0 | 27.1 | 142 | 160 |
जी.ए.3 100पीपीएम कमळफुल असतांना | 124 | 123 | 22.8 | 25.9 | 146 | 166 |
जी.ए.3 200 पीपीएम कमळफुल नसतांना | 120 | 120 | 23.5 | 27.2 | 149 | 171 |
जी.ए.3 100पीपीएम कमळफुल नसतांना | 112 | 110 | 27.0 | 30.8 | 154 | 175 |
जी.ए.3 200 पीपीएम कमळफुल नसतांना | 110 | 110 | 29.3 | 33.6 | 161 | 185 |