आज साखर अपारंपरिक ऊर्जाक्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. येत्या दोन वर्षांत राज्यात 60 ते 70 प्लान्ट साखर को-जनरेशन डिस्टिलरीज उद्योग येत आहेत. याचा विचार करून कुशल व तांत्रिक मनुष्यबळ घडविण्यासाठी राजारामबापू कॉलेज ऑफ शुगर टेक्नॉलॉजी या संस्थेने महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असणारा बी.एस्सी. शुगर टेक्नॉलॉजी पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा पदवी अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक उमेश पवार यांनी दिली.
असा आहे अभ्यासक्रम-
बी.एस्सी. शुगर टेक्नॉलॉजी पदवीमध्ये शुगर मॅन्युफॅक्चरिंग, शुगर इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, केमिकल कंट्रोल, प्रोसेस कंट्रोल, सिस्टिम ऍण्ड इन्स्ट्रुमेशन इक्विपमेंट डिझाईन ऍण्ड कॅपॅसिटी कॅल्क्युलेशन, अल्कोहोल टेक्नॉलॉजी वॉटर मॅनेजमेंट, इन-को जनरेशन बिझनेस मॅनेजमेंट ऍण्ड मार्केटिंग फॉर शुगर इंडस्ट्रीज या अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश आहे. विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन दिवस प्रशिक्षण दिले जाते, तसेच सुट्टीच्या कालावधीत सलग प्रशिक्षण दिले जाते. सलग प्रशिक्षण दिल्याने विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या ज्ञान मिळते.
नोकरीची संधी- मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास व औद्योगिक प्रशिक्षणासाठी स्वतंत्र विभाग सुरू आहे. या विभागामध्ये प्रशिक्षणाबरोबर मुलांच्या नोकरीच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. त्या विद्यार्थ्यांना 15 ते 20 हजार रुपये इतके वेतन मिळत आहे. साखर व उपपदार्थ उद्योग, अल्कोहोल इंडस्ट्रीज केमिकल, फूड इंडस्ट्रीज आदी ठिकाणी नोकरीची संधी आहे; तसेच स्वतंत्र उद्योग व व्यवसायाची संधी आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रम-
पदवी अभ्यासक्रमानंतर एम.एस्सी. इन्स्ट्रुमेशन, केमिस्ट्री अल्कोहोल टेक्नॉलॉजी, शुगर टेक्नॉलॉजी, इनव्हायर्न्मेंटल सायन्स व एमबीएमध्ये पदवी घेता येते.
सवलती :
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाजकल्याण शिष्यवृत्ती, साखर उद्योगाने विद्यार्थ्यास पुरस्कृत केल्यास त्यांना विशेष सुविधा दिल्या जातात. उद्योगात कार्यरत असणाऱ्यांनाही प्रवेश दिला जातो. इनप्लान्ट प्रशिक्षण, प्लेसमेंट आणि प्रशिक्षण विभागाची स्वतंत्र सोय आहे.
पात्रता - 12 वी विज्ञान, डी. फार्मसी, इंजिनिअरिंग डिप्लोमा, एमसीव्हीसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बी.एस्सी. पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो.
10 वी उत्तीर्ण नंतरच्या शिक्षण संधी - पेन बॉयलिंग, बॉयलर अटेंडंट, ड्रॉफ्टस्मन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन ऍण्ड डिस्ट्रिब्युशन इन्स्ट्रुमेंटेशन प्रोसेस प्लान्ट मेंटेनन्स, फिटर, वेल्डिंग टेक्नॉलॉजी, मेडिकल लॅब टेक्निशियन असिस्टंट हे महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मान्यतेने व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू आहेत.
संपर्क - 02342 - 222961
राजारामबापू कॉलेज ऑफ शुगर टेक्नॉलॉजी, इस्लामपूर, जि. सांगली
www.sugartechnology.in