फळबाग लागवडीपूर्वी माती परीक्षणासाठी जमिनीचा रंग, खडकाळपणा, उंच-सखलपणा याप्रमाणे सारख्या गुणधर्मासाठी एक ते दोन हेक्टर क्षेत्राचे भाग पाडून त्याच्या मध्यभागी जास्तीत जास्त तीन फूट अथवा कठीण मुरूम अथवा खडकापर्यंत खड्डा घ्यावा. प्रत्येक एक फूट खोलीसाठी वेगळा नमुना घ्यावा. यासाठी एक फूट खड्डा पूर्ण झाल्यावर खड्ड्याच्या चार बाजूंची माती पाडून खड्ड्यामध्ये टाकावी. गोळा केलेली माती चांगली एकत्र मिसळावी. त्यातील अर्धा ते पाऊण किलो माती तपासणीसाठी घ्यावी.
दुसऱ्या थरातील खोलीसाठी वरील एक फूट सोडून त्यापासून खाली एक फूट खोलीपर्यंत चार बाजूंनी माती खड्ड्यात पाडावी व चांगली एकत्र करून त्यातील अर्धा ते पाऊण किलो तपासणीसाठी घ्यावी. तिसऱ्या थरासाठी खड्ड्याच्या तळापर्यंत तीन फूट खोलीपर्यंत अथवा मुरूम लागला असेल त्या खोलीपर्यंतच्या थरातील माती चारी बाजूंनी खड्ड्यात पाडावी. त्यातील अर्धा किलो नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावा. अशा प्रकारे नमुना तपासणीसाठी घ्यावा.
- 02426 - 243861
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20120102/4922841066775574117.htm