नारळ लागवडीसाठी एक वर्षे वयाची रोपे लागवडीसाठी निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्षे वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत. रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी करावी. दोन झाडांमधील अंतर योग्य असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. उंच वाढणाऱ्या नारळाच्या झाडाच्या पानाची लांबी 4.5 ते 5.5 मीटर असते. वजना मुळे पानाला धनुष्यासारख्या आकार येतो, त्यामुळे पानाचा देठ ते शेंड्यापर्यंत सरळ अंतर 3.25 ते 3.5 मीटर असते. म्हणून दोन माडा ंत 7.5 मीटर अंतर असेल तर नारळाच्या झावळ्या एकमेकांत शिरणार नाहीत किंवा एकमेकांना झाकणार नाहीत. माडापासून योग्य प्रमाणात उत्पन्न मिळण्यासाठी नवीन सलग लागवड करताना दोन ओळींत आणि दोन रोपांत 7.5 मीटर अंतर असणे गरजेचे आहे. परंतु पाटाच्या, शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने एका ओळीत नारळाची लागवड करावयाची असल्यास 6.75 किंवा सात मीटर अंतर ठेवले तरी चालेल. ठेंगू जातीसाठी सहा मीटर अंतर चालू शकते.
जातींची माहिती
उंच जाती
1) वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली) - भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील उ ंच जातीला वेस्ट कोस्ट टॉल म्हणतात. या जातीलाच कोकणात बाणवली या नावाने संबोधले जाते. या जातीचे आयुष्यमान 80 ते 100 वर्षे असून सहा ते सात वर्षांनी फुलोऱ्यात येते. पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडापासून सरासरी 80 ते 100 फळे मिळतात.
2) लक्षद्वीप ऑर्डिनरी (चंद्रकल्पा) - ही लक्षद्वीप बेटावरील नारळाची जात आहे. या जातीची झाडे आणि फळे बाणवलीसारखीच असतात, परंतु फळाच्या तीनही कडा उठावदार असतात, पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी 150 फळे मिळतात. या जातीच्या नारळात सरासरी 140 ते 180 ग्रॅम खोबरे मिळते, तर तेलाचे प्रमाण 72 टक्के असते.
3) प्रताप - कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी येथे ही जात बाणवली वाणातून निवड पद्धतीने विकसित करून महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आली आहे. नारळाचा आकार मध्यम, गोल असून ती सहा ते सात वर्षांत फुलोऱ्यात येते. या जातीच्या एका झाडापासून 150 नारळ मिळतात.
4) फिलिपिन्स ऑर्डिनरी - ही उंच प्रकारातील जात असून याची लागवड मोठ्या प्रमाणात फिलिपिन्स येथे केली जाते. या जातीचे नारळ आकाराने फारच मोठे असतात. एका नारळापासून सरासरी 213 ग्रॅम खोबरे मिळते, तर नारळाचे उत्पादन 94 ते 159 असून सरासरी 105 नारळ आहे.
ब) ठेंगू जाती
या जातीची झाडे उंचीने ठेंगू असतात आणि लवकर म्हणजे लागवड केल्यापासून तीन ते चार वर्षांनी फुलोऱ्यात येतात. ही जात सिंगापुरी या नावानेही ओळखली जाते, परंतु नारळामध्ये सिंगापुरी अशी जात नाही. ठेंगू जातीचे आयुष्यमान 30 ते 35 वर्षे असते. रंगावरून ऑरेंज डाफर् , ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ अशा पोटजाती आहेत. त्यातील ऑरेंज डार्फ ही जात शहाळ्यासाठी सर्वांत उत्तम असून तिच्या 100 मि.लि. पाण्यात सात ग्रॅम एवढे साखरेचे प्रमाण असते.
क) संकरित जाती
1) टी ु डी (केरासंकरा) - ही जात "वेस्ट कोस्ट टॉल' किंवा बाणवली आणि चौघाट ऑरेंज डार्फ यांच्या संकरातून तयार केली आहे. या जातीची झाडे चार ते पाच वर्षांत फुलोऱ्यात येतात. एका झाडापासून 100 ते 160 नारळ फळे, तर सरासरी 150 नारळ फळे मिळतात. खोबऱ्यात तेलाचे प्रमाण 68 टक्के इतके असते.
2) टी ु डी (चंद्रसंकरा) - या संकरित जातीची फळधारणा चार ते पाच वर्षांनी होते. या जातीचे उत्पादन प्रति वर्षी 55 ते 158 फळे असते, तर सरासरी उत्पादन 116 फळे आहे.
: 02352- 235331
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी
Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20120102/5439768611959656204.htm