वालसावंगी, जि. जालना : राज्यात फुलपिकांखालील क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी राज्य शासनातर्फे फुलोत्पादन विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खर्च मर्यादेच्या 50 टक्के अथवा कमाल 35 हजार रुपये प्रति हेक्टरपर्यंत अनुदान दिले जात आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
राज्यातील हवामान व भौगोलिक परिस्थिती फुलांच्या उत्पादनासाठी अतिशय अनुकूल आहे. राज्यात पारंपरिक फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात असून, फुलपिकाखालील क्षेत्रवाढीचा दर 11 टक्के आहे.
योजनेअंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात भोकरदन तालुक्यातील वालसावंगी, पिंपळगाव, रेणुकाई, वडोदतांगडा, पळसखेडा ठोंबरे या चार गावांनी सहभाग नोंदवा आहे. येथील 48 शेतकऱ्यांनी 20.10 हेक्टरवर फूल लागवड केली आहे. यासाठीचे दोन लाख 55 हजार रुपयांचे अनुदान नुकतेच भोकरदन तालुका कृषी अधिकारी एम. एस. बोईनवाड यांच्या हस्ते देण्यात आले.
...असा आहे फुलोत्पादन विकास कार्यक्रमाचा उद्देश
- राज्यातील शेतकऱ्याचा कल फुलशेतीकडे वाढवणे
- फुलशेतीतून सामान्य शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचावणे
- नियमित, पारंपरिक फुलांसह आधुनिक फूल जातींच्या लागवडीस प्रोत्साहन देणे
- फूल शेतीखालील क्षेत्र वाढवणे
- मोठ्या शहरांलगत हरितगृह, तसेच खुल्या वातावरणातील फूल शेतीला चालना देणे
- फुलांची निर्यात वाढविणे
- फूल उत्पादकता, फुलांचा दर्जा वाढवणे
- आधुनिक, उच्चतंत्र लागवड पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे
--------------
फुलोत्पादन विकास कार्यक्रमातील :
- शेतकऱ्यांमध्ये फुलपिकांबाबत आवड निर्माण करणे
- योजनेच्या लाभासाठी नवीन लागवड करणे आवश्यक
- समूह पद्धतीने फुलांची लागवड करणे आवश्यक
- लागवडीत कट फ्लॉवर्स, कंदवर्गीय फुले तसेच सुटी फुले यांचा अंतर्भाव असावा
- जिल्ह्यातील एकूण फुलोत्पादन प्रकल्पास जिल्हा अभियान समिती मंजुरी देईल
- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैयक्तिक लाभार्थ्यास अनुदान मंजूर करतील
फूल लागवडीसाठी अनुदान निकष
फूल प्रकार - शेतकरी स्तर - खर्च मर्यादा (रुपये प्रति हेक्टर) - अनुदान मर्यादा (रुपये प्रति हेक्टर) - क्षेत्र मर्यादा (हेक्टर)
कट फ्लॉवर - अल्पभूधारक - 70,000 - 50 टक्के, कमाल 35,000 - 2
कट फ्लॉवर - इतर - 70,000 - 33 टक्के, कमाल 23,100 - 2
कंदवर्गीय फुले - अल्पभूधारक - 90,000 - 50 टक्के, कमाल 45,000 - 2
कंदवर्गीय फुले - इतर - 90, 000 - 33 टक्के, कमाल 29,700 - 2
सुटी फुले - अल्पभूधारक - 24,000 - 50 टक्के, कमाल 12,000 - 2
सुटी फुले - इतर - 24,000 - 33 टक्के, कमाल 7,920 - 2

सुनील तेलंग्रे
Sunday, December 25, 2011 AT 03:45 AM (IST)