फूड टेक्नॉलॉजी (अन्नतंत्रज्ञान) हा चार वर्षांचा अभ्यासक्रम असतो. यात एकूण आठ सत्र असतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बी.टेक. (फूड टेक्नॉलॉजी) ही पदवी मिळते. त्यानंतर एम.टेक. (फूड टेक्नॉलॉजी) हा पदव्युत्तर पदवीचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. फूड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी यशस्वी उद्योजक बनावेत, यासाठी या अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्रात कार्यानुभवातून शिक्षण या योजनेखाली अन्नप्रक्रियेशी संबंधित विविध पदार्थांची निर्मिती व मार्केटिंग विद्यार्थी स्वतः करतात, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्य विकसित होते. आठव्या सत्रात अन्न व तत्सम उद्योगांतून प्रशिक्षण दिले जाते. आठव्या सत्रात चार महिने प्रशिक्षण असते.
फूड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमात पुढील विषयांचा समावेश असतो. - अन्नशास्त्र व तंत्रज्ञान
- अन्न अभियांत्रिकी
- अन्न आणि औद्योगिक सूक्ष्म जीवशास्त्र
- अन्न रसायनशास्त्र आणि पोषण शास्त्र
- अन्न व्यापार आणि व्यवस्थापन विभाग
विविध ठिकाणच्या संधी
- फूड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय (शासकीय / खासगी) अन्नप्रक्रिया उद्योगातून तांत्रिक मनुष्यबळ निर्मितीसाठी अनेक संधी उपलब्ध असतात; तसेच महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनातून "अन्न सुरक्षा अधिकारी' (फूड सेफ्टी ऑफिसर) या पदासाठी देखील विद्यार्थ्यांना अर्ज करता येऊ शकतो.
- या क्षेत्रातील उच्चशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी पायाभूत ज्ञान मिळून, स्थानिक स्रोतांचा वापर करून नावीन्यपूर्ण अन्नपदार्थांची निर्मिती करण्यासाठी या मनुष्यबळाचा वापर होऊ शकतो.
- राष्ट्रीय पातळीवरील संशोधन संस्थांमधून शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत करण्यासाठी उदा. सीएफपीआरआय (सेंट्रल फूड प्रोसेसिंग रिसर्च इन्स्टिट्यूट), डीएफआरएल (डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरी) यासारख्या राष्ट्रीय संशोधन संस्थांत संधी आहेत.
- महाराष्ट्र शासनाच्या कायदा व सुव्यवस्था प्रशासनातही या विद्यार्थ्यांना संधी आहेत.