उच्चशिक्षण घेऊन परदेशात जाण्याचे स्वप्न अनेक युवक बाळगतात. मात्र अशी संधी धुडकावून ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसाय उभारणारे तरुण खूपच कमी प्रमाणात आढळतात. शिकलेल्या ज्ञानाचा वापर करून आपल्याच भागातील शेतकऱ्यांना वेगळी वाट दाखविण्याचे काम जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील युवक करीत आहे. सचिन सूर्यकांत शेडशाळे हे या एकोणतीस वर्षीय युवकाचे नाव. सुमारे एक कोटी रुपये खर्च करून त्यांनी जैविक खते, कंपोस्ट विघटन कल्चर निर्मिती व तपासणी प्रयोगशाळा उभारली आहे. गुणवत्ताप्रधान अशा या प्रयोगशाळेचे रूप म्हणजे तरुणाची जिद्द व अभ्यासू वृत्ती स्पष्ट करणारी आहे. नत्र स्थिर करणारे, पालाश विरघळवणारे, स्फुरद विरघळणारे जिवाणू तयार करण्याबरोबरच कंपोस्ट जिवाणू संवर्धक तयार करून त्याची विक्री केली जाते. ग्रीन अर्थ ऍग्रो बायोटेक या नावाने ही प्रयोगशाळा उभी आहे.
नावीन्याच्या ध्येयाने उभारली प्रयोगशाळा
सचिन यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदवी, तर पदव्युत्तर पदवी जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी) विषयात घेतली. त्यानंतर खते, कीडनाशके कंपन्यात तसेच कृषी विभागाच्या रासायनिक अवशेष नियंत्रण प्रयोगशाळेतही त्यांनी कामाचा अनुभव घेतला. शाश्वत शेती हे उद्दिष्ट ठेवून प्रामाणिकपणे या क्षेत्रात काम करण्याची इच्छा बाळगत सचिन यांनी नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. जैविक खतांच्या पुरेशा माहिती अभावी शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते. फसवणूक टाळण्याबरोबरच जमिनीची सुपीकतादेखील महत्त्वाची आहे. आपल्या भागातील शेतकऱ्यांत याबाबत अधिकाधिक जागृती करण्याचे त्यांनी ठरवले. दरम्यान आयर्लंडमधून सचिन यांना रासायनिक अवशेष व सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात दीड कोटी रुपयांच्या फेलोशिपची "ऑफर' आली होती. पण त्यांनी ती नाकारली. प्रयोगशाळा उभारणे हेच ध्येय होते. त्यासाठी वडिलांची मोठी साथ मिळाली. मित्रांनीही मदत केली. कर्ज काढण्यासाठी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना बारीकसारीक तपशील सांगावा लागला. अडचणीपुढे न डगमगता सचिन यांनी प्रयोगशाळेची उभारणी केली. यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून माहिती संकलित करण्याबरोबर अनेक पुस्तकांचे वाचनही त्यांनी केले.
आंतरराष्ट्रीय निकषांप्रमाणे उभारणी
जयसिंगपूरपासून जवळच असणाऱ्या मौजे आगर या ठिकाणी सचिन यांनी सुमारे दहा हजार चौरस फूट क्षेत्रावर सुसज्ज प्रयोगशाळा उभारली आहे. या प्रयोगशाळेत सुमारे अकरा खोल्या आहेत. प्रत्येक खोलीच्या प्रकारानुसार त्यातील वातावरण नियंत्रित ठेवण्यात आले आहे. क्वालिटी कंट्रोल लॅब, इनॉक्युलेशन रूम, इनक्युबेशन रूम, स्टरीलायझेशन रूम, फर्मेंटेशन रूम, रॉ मटेरिअल रूम, फॉर्म्युलेशन व पॅकिंग रूम असे त्यांचे वर्गीकरण केले आहे. सुमारे पंचवीस लाख रुपयांची आधुनिक यंत्रसामग्री बसविण्यात आली असून विविध विषयात पदवी घेतलेले सहा तंत्रज्ञ काम तेथे करत आहेत. प्रवेशद्वाराजवळ चेंजिंग रूम आहे. तेथे ठराविक ड्रेसकोड घालून कर्मचाऱ्याला प्रवेश करण्याचे बंधन आहे.
त्याला लागूनच रॉ मटेरिअल स्टोअरेज रूम म्हणजे कच्चा माल ठेवण्यासाठी खोली आहे. येथून विशेष गुणवत्तायुक्त ग्रेडचा कच्चा माल गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेत येतो. तेथे मालाची तपासणी होते. जिवाणू खत तयार करण्यासाठी उपयुक्त जिवाणूंची वाढ करण्यासाठी कल्चर मीडिया वापरले जाते. ऑटोक्लेव्हच्या साहाय्याने निर्जंतुकीकरण केले जाते. मीडियामध्ये उपयुक्त जिवाणूंची वाढ व तपासणीसाठी इनॉक्युलेशन रूममधील लॅमिनार एअर फ्लोचा वापर केला जातो. द्रवरूप तसेच घन स्वरूपात शेकर व इनक्युबेटरच्या साहाय्याने जिवाणूंची वाढ केली जाते. थंड व गरम अशा नियंत्रित वातावरणाच्या खोल्यांमधून पुन्हा तपासणी केली जाते. जिवाणूंची योग्य वाढ व स्थिती त्याद्वारे जाणून घेतली जाते. त्यानंतर फॉर्म्युलेशन रूममध्ये ब्लेंडरच्या साहाय्याने मिक्सिंग केले जाते. अशा रीतीने संपूर्ण नियंत्रित व शास्त्रीय वातावरणात जैविक खताची निर्मिती केली जाते. दिवसाला पाचशे ते एक हजार किलो या क्षमतेने ही खतनिर्मिती होते. पावडर स्वरूपाचे एक किलो व पाच किलोमध्ये पॅकिंग केले जाते. द्रवरूप खताचेही एक व पाच लिटरमध्ये पॅकिंग होते. उत्पादन खर्च वजा जाता दहा टक्क्यांपर्यंत नफा राहतो. जिवाणू खताची निर्मिती करताना खोलीच्या बाहेरील व आतील वातावरणाचा मेळ घालावा लागतो. वातावरणातील घटकांचा संसर्ग होऊ नये यासाठी नियंत्रित स्थिती ठेवली जाते. ऑपरेशन थिएटरमध्ये जशा सुविधा असतात तशा सुविधा जिवाणूच्या निर्मितीसाठी वापरल्या जातात. जिवाणूंची वाढ योग्य प्रमाणात व्हावी यासाठी काटेकोर काळजी घ्यावी लागत असल्याचे सचिन यांनी सांगितले.
स्वतःच्या व शेतकऱ्यांच्या शेतीत प्रयोग
प्रयोगशाळेत तयार झालेल्या जिवाणू खतांचे प्रयोग प्रयोगशाळेशेजारील शेतात करण्यात आले आहेत. सचिन यांची आठ एकर शेती आहे. त्यामध्ये उसासह केळी व अन्य पिके घेतली आहेत. या प्लॉटवर जिवाणूखतांची प्रात्यक्षिके घेतली जातात. शेतकऱ्यांना प्रशिक्षण कार्यक्रम, मेळाव्यांमधून या खतांविषयी माहिती दिली जाते.
प्रयोगशाळा उभारणीची सचिन यांची भूमिका
सचिन म्हणाले, की प्रयोगशाळेत अद्ययावत जैविक माहिती व परीक्षण, कृषिविषयक सल्लाही दिला जातो. प्रात्यक्षिक प्लॉटवरही प्रशिक्षण दिले जाते. शेतकऱ्यांनी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरावे या विचाराने प्रयोगशाळेची उभारणी केली. प्रयोगशाळेला शेतकरी प्रतिसाद देत असल्याने पर्यावरणपूरक शेती करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना निश्चितपणे उद्युक्त करू, असा विश्वास सचिन यांनी या वेळी व्यक्त केला.
ही उद्दिष्टे ठेवून उभारली प्रयोगशाळा
* "जमीन वाचवा, जीवन वाचवा' या जाणिवेतून उभारणी
* एकात्मिक पाणी, अन्न व कीडनियंत्रण
* नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन
* रसायनविरहित अन्न सर्व प्राणिमात्रांच्या संगोपनासाठी
* मातीची सुपीकता टिकविण्यासाठी
* संतुलित पर्यावरणासाठी
या जिवाणूखतांची होते निर्मिती 1) ऍझोटोबॅक्टर
2) अझोस्पिरीलम
3) रायझोबियम
4) स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पीएसबी)
5) कंपोस्ट विघटन करणारे बुरशी व जिवाणूयुक्त संवर्धक
शेतकऱ्यांना जिवाणू खताचे शास्त्र, त्यांचा शास्त्रीय वापर करण्याची पद्धती याबाबत सखोल माहिती देण्याची गरज आहे. आम्ही त्यांना शास्त्रीयदृष्ट्या ज्ञानी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या खतांचे महत्त्व अधिकाधिक पटून त्यांचा वापर नक्की वाढेल. एका अहवालानुसार भारतात सात लाख मे.टन जिवाणू खताची गरज असून आपल्याकडे केवळ तीन हजार टन खताचीच निर्मिती केली जाते. कृषी विभाग, रोपवाटिका यांच्याशी संपर्क केला असून त्यांना उत्पादने देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या क्षेत्रात स्पर्धक आहेत. उत्पादनाची गुणवत्ता असली तरी विक्रीची जबाबदारीही आहे. मात्र गुणवत्ता आणि विश्वास यावर भर दिला आहे.
सचिन शेडशाळे
संपर्क-
सचिन शेडशाळे-9767501782