छोट्या जमिनी व डोंगराळ भागांचा तालुका म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी. अशा भागात खासगी दुग्ध संघ उभारणे म्हणजे आव्हानच. त्यातच अन्य संघांशी स्पर्धा सोपी नाही. मात्र, तालुक्यातील वडगावच्या एका जिद्दी युवकाने सर्व आव्हाने पेलत दुग्ध व्यवसाय फायद्यात नेला. त्यासाठी बांधलेली सूत्रे, व्यवस्थापन व शेतकऱ्यांशी साधलेला समन्वय हे घटक यशाला पूरक ठरले.
राजकुमार चौगुले
कोल्हापूर जिल्हा म्हणजे ऊस व दुग्ध व्यवसायाचं आगार. मात्र, जिल्ह्याच्या पश्चिम भागात पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावड्यासारखे डोंगराळ तालुके, संपर्काच्या अडचणी यामुळे या भागात पूरक व्यवसाय उभारून तो नावारूपाला आणणं जिकिरीचं काम. सहकाराची गंगा वाहत असताना स्पर्धेला तोंड देऊन खासगी दूध संघ चालविणं हे सोपं काम नाही. मात्र, दांडगा जनसंपर्क व इच्छाशक्तीच्या जोरावर पस्तीस वर्षांच्या युवकाने हे आव्हान पेललं, ते यशस्वीही करून दाखविलं. ऍड. राहुल दिनकरराव पाटील - थोरात हे या जिद्दी युवकाचं नाव. शाहूवाडी तालुक्यातील वडगाव (थोरातांचं) या केवळ बाराशे लोकसंख्या असणाऱ्या दुर्गम गावचे ते रहिवासी. तब्बल दोनशे पन्नास दुग्ध संस्थांच्या एकत्रीकरणातून "समाधान मिल्क आणि प्रॉडक्ट्स' हा खासगी संघ त्यांनी उभारला. सहकाराच्या गंगेत तो आदर्शवत ठरला आहे. सहकारी दूध संघांच्या उणिवा दूर करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा भाव मिळवून देणे, हे प्रमुख सूत्र संघाने राबविलं. यामुळेच जिल्ह्यातील बड्या संघांच्या स्पर्धेतही हा संघ टिकून आहे.
प्रतिकूल परिस्थितीतून उभारणी शाहूवाडी तालुका म्हणजे छोट्या जमिनी व डोंगराळ भाग, त्याचा विकास जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांच्या मानाने कमी आहे. तालुका ठिकाणापासून पंधरा किलोमीटरवरील वडगाव हे राहुल यांचं गाव. त्यांनी मुंबईत वकिलीची पदवी घेतली. सुमारे पाच वर्षे प्रॅक्टिसही केली. या क्षेत्रात नाव कमविण्याची संधी त्यांना होती; मात्र आपल्या भागासाठी दुग्ध व्यवसाय अधिक प्रभावी ठरेल, या उद्देशाने त्यांनी त्यावर लक्ष केंद्रित केलं; पण सहकारी दुग्ध संघांचं प्राबल्य असणाऱ्या या भागात खासगी दुग्ध संघ उभा करायचा म्हणजे दिव्य आव्हान होतं. अपेक्षेप्रमाणे मोठा विरोध झाला. राहुल यांनी जिद्द सोडली नाही. वकिलीच्या माध्यमातून जोडलेल्या माणसांचा उपयोग त्यांना दुग्ध व्यवसायासाठी झाला. राहुल यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय असली तरी त्यांनी स्वतःला राजकारणापासून अलिप्तच ठेवलं. सहकारी संघांच्या खाबूगिरीचा अभ्यास केला. अनेक संघ बॅंकेप्रमाणे शेतकऱ्यांच्या दुधाच्या रकमेतील काही भाग विविध निधीच्या नावाखाली कापून घेतात, यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. सर्वच्या सर्व रक्कम शेतकऱ्यांना दिली तर त्यांचा फायदा होऊ शकतो, हे सूत्र मनात पक्कं केलं. डोंगराळ गावांमध्ये व्यवसाय करणं आव्हानाचं होतं; मात्र प्रभावी जनसंपर्काच्या माध्यमातून राहुल यांनी वाड्या-वस्त्यांवरही संपर्क साधला. हे काम सुमारे पाच ते सहा महिने सुरू ठेवलं. विविध प्रयत्नांतून एक सप्टेंबर 2009 ला दूध संघाची मुहूर्तमेढ रोवली गेली. चांदोली धरण ते शित्तूर या सुमारे सव्वाशे किलोमीटर परिसरातील गावांतून दुग्ध संकलनास प्रारंभ केला. सुरवातीला साडेसातशे लिटर दूध संकलनावरून सुरवात झाली. टप्प्याटप्प्याने हे संकलन नऊ हजार लिटरवर पोचलं आहे. शाहूवाडी, पन्हाळा व शिराळा तालुक्यात आता "समाधान' दूध संघाच्या दोनशे अठ्ठेचाळीस दुग्ध संस्था आहेत. अगदी वीस लिटर दूध संकलनाकरिताही संस्था आहे. दुर्गम भागातील दूधही घ्यायचं, या जिद्दीने परवडत नसतानाही काही संस्था उभ्या राहिल्या. त्यातूनच समाधान संस्थेत वीस लिटरपासून साडेपाचशे लिटरपर्यंत दूध संकलन केलं जातं. डोंगराळ भाग असल्याने नामवंत जातींच्या जनावरांची उपलब्धता या भागात नाही. "गवळाट' या स्थानिक जातीच्या म्हशीचं दूध जास्त प्रमाणात येतं.
असं आहे व्यवस्थापन
सहकारी दूध संघाच्या धर्तीवर समाधानचं काम चालतं. प्रत्येक दुग्ध संस्थेत मिल्को टेस्टर, वजन काटा, कॅन आदी सुविधा आहेत. वडगाव येथील मुख्य संकलन केंद्रासह दुग्ध संस्थांमध्ये 42 कर्मचारी आहेत. काही कर्मचाऱ्यांना दुधाच्या संकलनावरही पैसे दिले जातात. संघात संकलन अधिकारी, सुपरवायझर, पशुवैद्यकीय अधिकारी अशांसह अकाउंट, तांत्रिक विभाग आहेत. प्रत्येक विभागात स्वतंत्र तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक आहे. संघाची चार व भाड्याने घेतलेल्या अठरा वाहनांच्या माध्यमातून दररोज वडगाव येथील मुख्य संकलन केंद्रावर दूध संकलन केलं जातं. संध्याकाळी व सकाळचं दूध एकत्र करून दुसऱ्या दिवशी दुपारी ते विक्रीसाठी चितळे दूध संघ व अन्य ठिकाणी पाठविलं जातं. दूध आल्यानंतर त्याचं वजन केलं जातं. फॅट तपासणीनंतर डंप टॅंकमध्ये ओतलं जातं. थंड पाण्याच्या युनिटच्या साहाय्याने प्लेटच्या माध्यमातून दूध थंड केलं जातं. योग्य तापमानात थंड झाल्यानंतर ते स्टोअरेज टाकीत नेलं जातं. साडेपाच हजार लिटरच्या दोन स्टोअरेज टाक्या यासाठी बसविण्यात आल्या आहेत. यातून दूध थेट टॅंकरमध्ये भरलं जातं, तेथून बाहेर रवाना केलं जातं.
ओव्हरहेडची रक्कम हाच "नफा'
दूध विक्रीतून शेतकऱ्यांच्या पैशांव्यतिरिक्त लिटरला चार ते पाच रुपये ओव्हरहेडची रक्कम मिळते. ही रक्कम हाच नफा समजून संघाचं कार्य चालतं. लिटरला चार रुपये रक्कम गृहीत धरली, तर त्यातून एक रुपया वीस पैसे वाहतुकीसाठी, साठ पैसे प्रोसेसिंगसाठी, ...............पंचवीस पैसे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी, ............एक रुपया दहा पैसे शेतकऱ्यांच्या बोनससाठी खर्ची पडतात. शिल्लक राहिलेले नव्वद पैसे ते एक रुपया हाच निव्वळ नफा, हे व्यवसायाचं सरळ सूत्र असल्याचे राहुल यांनी सांगितले. अन्य संघ आर्थिक वर्षाचा बोनस शेतकऱ्यांना देतात. हा संघ पूर्ण वर्षाचा म्हणजे गेल्या दिवाळीपासून ते या दिवाळीपर्यंत असा बोनस देतो. खर्चावर कसं नियंत्रण ठेवायचं हा विचार असतो. सायंकाळी उशिरापर्यंत दिवसाच्या खर्चाचा तपशील येतो. दुधाचं संकलन किती झालं, वाहतूक खर्च किती झाला, याचा विचार केला जातो. खर्चात बचत हा नफा वाढविण्याचा मोठा मार्ग आहे, असं सूत्र स्वीकारलं असून, सुुमारे दीड कोटी रुपयांची गुंतवणूक या व्यवसायासाठी झाली आहे.
दूध संकलन केंद्रावर सीसीटीव्हीची नजर सर्व काम चोख व्हावं यासाठी मुख्य संकलन केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यांना "इंटरनेट कनेक्टिव्हिटी' असल्याने संस्थेत दूध संकलन कसं चालले आहे, याचं परीक्षण करता येतं. दूध संकलन केंद्राबरोबरच अकाउंट विभागातही कॅमेरे बसवले आहेत.
अशीही कल्पकता
राहुल यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचं राजकीय वलय मोठं आहे; पण त्यांनी दुग्ध व्यवसायाला राजकारणाची किनार आणली नाही, हे त्यांचं मोठं यश आहे. त्यांचा एक किस्सा खूप मजेदार आहे. दूध संकलन केंद्राच्या एका गावामध्ये राजकीय गट - तट मोठे आहेत. गावातील सर्व लोक राहुल यांना मानतात; पण गावातील विरोधकांच्या गल्लीत जाऊन आम्ही तुम्हाला दूध देणार नाही, असा प्रवाह या गावचा होता. यामुळे या गावात चार ठिकाणी चार दुग्ध संस्था राहुल यांनी काढल्या आणि गावचं दूध संकलन केलं. राजकारणामुळे दुधाचं संकलन बंद होऊ नये यासाठी राहुल यांनी लढविलेली ही युक्ती निश्चितपणे व्यावसायिकदृष्टीला प्राधान्य देणारी ठरली.
संपर्क ऍड. राहुल पाटील - थोरात - 9325901717
मु.पो. वडगाव (थोरातांचं), ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर