गर्भावस्थेत गाभण जनावराला स्वतःच्या पोषणाकरिता त्याचबरोबर गर्भाची वाढ चांगली होण्याकरिता जनावरास पोषक व पचनास सुलभ असणारे अन्न देणे चांगले असते. सर्वसाधारणपणे म्हशीचा गाभणकाळ दहा महिने, दहा दिवस, तर गाईचा गाभणकाळ नऊ महिने, नऊ दिवस असतो. गाभण जनावरांचा खुराक समतोल असावा. त्यात प्रथिने पिष्टमय पदार्थ, खनिज क्षार, जीवनसत्त्वे हे सर्व घटक योग्य प्रमाणात असले पाहिजेत. गर्भावस्थेचे अंतिम काळात अशा गाभण जनावरांना पोषणाकरिता एक किलो जादा पशुखाद्य खुराक म्हणजे दररोज दोन किलो खुराक देणे आवश्यक असते. त्यामुळे गर्भाची वाढ चांगली होते.
http://www.agriplaza.in/agri-guide.htm
http://www.agriplaza.in/agri-guide.htm