केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट, हैदराबाद येथे दूरस्थ शिक्षण पद्धतीसह उपलब्ध असणाऱ्या "स्थायी ग्रामीण विकास' विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी खालील प्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अभ्यासक्रमाचे स्वरूप ः हा अभ्यासक्रम हैदराबाद विद्यापीठातर्फे घेण्यात येतो. अभ्यासक्रम टपालाद्वारे उपलब्ध असून त्यासाठी काही निवडक शहरांमध्ये मार्गदर्शनपर केंद्र पण उपलब्ध आहेत. अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना हैदराबाद विद्यापीठ व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने पदविका देण्यात येते.
आवश्यक शैक्षणिक पात्रता ः अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व त्यांना इंग्रजीचे पुरेसे ज्ञान असायला हवे.
अभ्यासक्रमाचा कालावधी व माध्यम ः अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा असून तो इंग्रजी माध्यमातून उपलब्ध आहे. अभ्यासक्रमाची सुरवात जानेवारी 2012 पासून होईल.
निवड प्रक्रिया ः अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांमधून त्यांची गुणवत्ता व गुणांकाच्या आधारे त्यांची अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल.
अभ्यासक्रमाचे शुल्क ः निवड झालेल्या उमेदवारांना ते सर्वसाधारण गटातील असल्यास 16,000 रुपये (राखीव गटातील विद्यार्थ्यांना 15,000 रुपये) परीक्षा शुल्क म्हणून भरावे लागेल व त्यामध्ये अभ्यासक्रम मार्गदर्शन साहित्य घरपोच मिळू शकेल.
अर्ज व माहितीपत्रक ः
अर्ज व माहितीपत्रकासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंटच्या www.nird.ong.in या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा 500 रु.चा "एनआयआरडी- डीईसी- पीडीडी- एसआरडी' यांच्या नावे असणारा व हैदराबाद येथे देय असणारा डिमांड ड्रॉफट संस्थेच्या कार्यालयात विनंती अर्जासह पाठवावा. याशिवाय अधिक माहिती हवी असल्यास दूरध्वनी क्र. 040-248008585 वर संपर्क साधावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख :
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट, राजेंद्रनगर, हैदराबाद 500 020 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर अशी आहे.
Source Link; http://www.agrowon.com/Agrowon/20111129/5515850937155594759.htm