Friday, December 2, 2011

Business Line : Industry & Economy / Agri-biz : Farmers' Notebook: Farmers go to college to brush up their knowledge

Business Line : Industry & Economy / Agri-biz : Farmers' Notebook: Farmers go to college to brush up their knowledge

अध्यात्म

सुखरूप चाली । हळूहळू उसंतिली ।।
बाळगोपाळांची वाट । सेव्यसेवकता नीट ।। धृ ।।
जरी झाला श्रम । तरी पडो नेदी भ्रम ।।
तुका म्हणे दासा । देव सारिसा सारिसा ।।

भक्तिमार्ग हा सुरवातीपासून शेवटपर्यंत सुखरूप असल्याची ग्वाही तुकोबांनी दिलेली आहेच, त्याचेच स्पष्टीकरण प्रस्तुत अभंगामधून दिसून येते. ""झडझडोनी वाहिला नीघ । इथे भक्तिचिया वाटे लाग ।'' असे ज्ञानेश्‍वरीही सांगतेच. त्याच वाटेचा व वाटचालीचा हा तपशील. भक्तीचा मार्ग हा सेव्यसेवकतेचा, सेवेचा मार्ग आहे. परमेश्‍वर हा सेव्य असून, जीव भक्त होऊन त्याची सेवा करणारा सेवक असल्याचे हा मार्ग मानतो. अशा सेवक सखे-सवंगडी गवळ्यांच्या घरातील ही मुले कृष्णाची अनन्य भक्त होती. ""कोण ती भक्ती केली गोपाळी । काय ती सोवळी वोवळी । त्याचे उच्छिष्ट कवळ मी गिळी । प्रेम सप्रेमेळी डुल्लत ।।'' असे या बाळगोपाळांच्या निर्व्याज भक्तीचे आश्‍चर्ययुक्त वर्णन एकनाथांनी केले आहे. योग, ज्ञान, कर्म यांच्या वाटा वाकड्या आहेत. त्यांच्यात विघ्नेही भरपूर येतात. मात्र, ही बाळगोपाळांची वाट सरळ आहे, तिच्यात अडथळा नाही. तुकोबा सांगतात, की आम्ही याच वाटेने चालले आहोत. आमचे चालणे सावकाश आणि सुखकारक आहे. सेवाभक्‍तीची ही वाट ज्यांना माहीत नाही ते अडचणीत सापडतात. ""तुका म्हणे सेव्य सेवकता ठावी । पडती तरी गोवी न पडती।।'' असे सखेद उद्‌गार तुकोबांनी अशा लोकांबद्दल काढले आहेत. विशेष म्हणजे ही वाट चालणारांची सोबत करून देव त्यांची पाठराखणही करीत असतो. तो आपल्या या दासांच्या सतत बरोबर असतो. स्वतः तुकोबांचाच हा अनुभव आहे. ""जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविली हाती धरूनिया ।। चालो वाटे आम्ही तुझाची आधार । चालविसी भार सर्व माझा''
भक्तीची ही वाट सरळ असल्यामुळे ती चुकायचा संभव नाहीच; पण समजा चुकलीच, तर ""चुकली ते वाट । पुढे सापडवी नीट ।।'' असे त्यांना सावरायला देव उभाच आहे. या वाटेने चालणारांना श्रम झाला, थकले तरी त्यांना विपरीत ज्ञानादी भ्रम मात्र होत नाही, कष्ट झाले तरी भोवळ येत नाही. तो त्यांना सतत जागे ठेवतो.
""तुका म्हणे दृष्टी । उघडितो नव्हे कष्टी ।।''
सेवाभक्तीच्या मार्गात अहंकाराचे पूर्ण विसर्जन, देवावर पूर्ण विश्‍वास आणि त्याच्यावर अवलंबिला त्याचा समावेश होतो.

भाजीपाल्याने भरली परसबाग...

आमच्या बंगल्याभोवती सुमारे 3000 चौ.फू. आणि गच्चीवर 1200 चौ.फू. अशी आमची बाग आहे. बंगल्याभोवती जमिनीमध्ये गुलाब, शोभेची झाडे, वेली, विविध प्रकारचे हेलिकोनिया व फुलझाडे आहेत. त्याचबरोबरीने शेल जिंजर, ऍन्थुरियम, ऑर्किड्‌स अशी शोभेची फुलझाडे आहेत. या बागेत छोटे लॉन केले आहे. त्याचबरोबरीने बोन्सायही केलेले आहे. बंगल्याच्याकडेने केशर आंबा, चिकू, सीताफळ, पेरू, नारळ इ. फळझाडांची लागवड केली आहे. गच्चीवर गुलाब व भाजीपाला लावलेला आहे.

फळझाडे, भाजीपाला, फुलझाडांना आम्ही सेंद्रिय खतेच वापरतो. बंगल्याच्या शेजारी उंच इमारती झाल्यामुळे घराभोवतीच्या बागेत ऊन कमी येऊ लागले. त्यामुळे आम्ही गेल्या दहा-बारा वर्षांपासून गुलाब व भाजीपाल्याची लागवड गच्चीवर करू लागलो.

भाजीपाल्यासाठी तीन फूट लांब, तीन फूट रुंद व केवळ सात इंच (दोन विटा) एवढ्याच उंचीचे वाफे बनविले आहे. या वाफ्यामध्ये तसेच कुंडीत आले, लिंबू, आंबेहळद, कांदा, लसूण, भुईमूग, शेवगा, बटाटा, घेवडा, वांगी, टोमॅटो, पालक, कोथिंबीर, आंबट चुका, मुळा, कढीपत्ता, मिरच्या, कोबी, फ्लॉवर, श्रावण घेवडा, मेथी, मोहरी, मका इ. सर्व भाज्या लावलेल्या आहेत. घोसाळे, दुधी भोपळा, कारले यांचे वेलही चांगले वाढले आहेत. यंदा कारले, आले, आंबेहळद व रताळ्याचे चांगले उत्पादन मिळाले. या वर्षी केवळ कारल्याच्या दोन वेलांवर 100 कारली लागली. परसबागेतील भाजीपाल्यामुळे घरच्या घरी ताजा भाजीपाला मिळतो. फळमाशीसाठी सापळा लावल्याने चांगला परिणाम दिसतो आहे.

सौ. आशा उगावकर,
पिंपळे निलख, पुणे

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20111126/5507413605321988189.htm

माझा अनुभव इतरांनाही मार्गदर्शक आहे

पदवीधर होऊन गावी आलो. आमची तेरा एकर शेती एकाच ठिकाणी आहे. मी एकुलता आहे. वडील मी सात वर्षांचा असताना एकाएकी वारले. माझे वडीलही एकटेच होते. आमच्या भावकीत सर्वांत जादा शेती माझीच आहे. चुलतभावांना एकर - दोन एकरच वाट्याला येते. वडील वारल्यानंतर आईचा भाऊ आमची शेती कसायचा. माझ्या मामाचा आम्हाला मोठा आधार होता. तो जर मदतीला नसता, तर एकट्या आईला शेती कसणं कठीण होतं. आईने कधीच कोणता व्यवहार केला नाही. ती एक साधी बाई आहे. अशा बाईला कोणीही फसवू शकला असता; पण आमच्या भावकीतील सगळ्यांचा तिला आधार होता. याचं कारण माझ्या वडिलांनी भावकीतील सगळ्यांना आधार दिला होता. आपल्या शेतातून जे काही येईल, त्यातील काही भाग ते भावकीतील प्रत्येक कुटुंबाला स्वतः नेऊन देत. आमच्या भावकीची सात घरं आहेत. आमचे खापरपणजोबा या गावात मजुरीसाठी आले होते. त्यांनी मजुरी करून गावात राहण्यापुरतं दोन खणांचं घर बांधलं. त्यांना तीन मुलं होती. त्यांनीही आयुष्यभर मजुरी केली. सर्वांत जो लहान होता, त्याने अंगावर काही काम घ्यायला सुरवात केली. त्यातून त्यांनी शेतीही विकत घेतली. एक पिढी केवळ राबण्यात गेली. दुसऱ्या पिढीत एक हुशार निघाला. त्याने शेतीवाडी कमवली. माझे ते आजोबा होते. माझ्या वडिलांनी आपल्या वडिलांचा आदर्श ठेवला; पण त्यांचं एकाएकी निधन झाले. त्याचं निदान काही झालं नाही. शेतावरून आले होते. हातपाय धुऊन धोतराने पुसत होते, तोच खाली कोसळले. मी सात वर्षांचा होतो. त्या वेळी मी हजर होतो. वडील अशा पद्धतीने गेल्यावर सगळ्यांचा आधार मिळाला. मला जसं कळू लागलं, तसा एक अनुभव मला नेहमी येत होता. गावातील लोक माझ्या वडिलांविषयी फार आपुलकीने बोलत. गावात असा एकही माणूस नसेल, ज्याला माझ्या वडिलांनी मदत केली नाही. मदत करताना त्यांची भावना चांगली असायची. गोरगरिबांचा फार मोठा दुवा त्यांना मिळाला होता. काही लोक म्हणायचे, "चांगली माणसं अशी लवकर देव कशासाठी नेतो?' तर काही म्हणायचे, "जो सर्वांना आवडतो, तो देवाला आवडतो.' खरं तर यामागील लोकांची भावनाही महत्त्वाची आहे.

पदवीधर होऊन गावी परत आलो. गावातील इतरांपेक्षा आमची परिस्थिती चांगली आहे. आईने काटकसर करून दोन पैसेही साठवले आहेत. आता सगळी शेती बागायती आहे. मामाने शेती इतकी वर्षे कसली; पण त्यांनी काही अपेक्षा ठेवली नाही. उलट ते म्हणायचे, "आमचं हे कर्तव्यच आहे. आम्ही आमचं कर्तव्य केलं आहे.' त्यांनाही काही कमतरता नाही. त्यांची चारही मुलं शिकून मोठ्या पदावर काम करीत आहेत. त्यांचीही बारा एकर शेती बागायती आहे. माझी इच्छा कोणतीही नोकरी न करता आपल्या शेतीत पूर्ण लक्ष घालायचं. त्यामागे माझा हेतू हाही आहे, की गावातील काहींना आपण मदतही करू शकू. आपण आपल्या वडिलांइतकं जरी कार्य करू शकलो नाही, तरी आपल्या वडिलांच्या नावाला कमीपणा येईल असं तरी आपल्या हातून काही घडू नये. कोणत्याही प्रसंगी माझ्या डोळ्यांसमोर माझ्या वडिलांची प्रतिमा उभी राहते. ते मार्ग दाखवीत आहेत असं वाटतं. याचं कारण माझ्या मनात सतत तोच विचार सुरू असतो. जर आपल्या मनात चांगले विचार सुरू असतील, तर आपल्याला स्वप्नंही चांगलीच पडणार! जे मनी वसे, तेच स्वप्नी दिसे.
माझे मामाही आता थकले आहेत. त्यांचीही शेती बागायती आहे. त्यांनाही कोणाची तरी मदत हवी आहे. मामांनी आमची शेती सांभाळली. आता मलाही त्यांना मदत करण्याची इच्छा आहे, कारण त्यांची मुलं नोकरीच्या निमित्ताने बाहेर असतात. एक मला जाणवतं आहे, आपण जर इतरांच्या उपयोगी पडलो, तर आपलंही काम कधी अडत नाही. खरं तर मी इतरांना मदत करीन असं म्हणत असलो, तरी इतरांचीही मला सर्वप्रकारे मदत होते. मला असं आयुष्य लाभलं. मी जसं वागतो आहे, तसं वागल्याने कुणालाही असं आयुष्य लाभू शकेल, असाच माझा अनुभव आहे.


Ref. LinK : http://www.agrowon.com/Agrowon/20111201/4989459279140643064.htm