आमच्या बंगल्याभोवती सुमारे 3000 चौ.फू. आणि गच्चीवर 1200 चौ.फू. अशी आमची बाग आहे. बंगल्याभोवती जमिनीमध्ये गुलाब, शोभेची झाडे, वेली, विविध प्रकारचे हेलिकोनिया व फुलझाडे आहेत. त्याचबरोबरीने शेल जिंजर, ऍन्थुरियम, ऑर्किड्स अशी शोभेची फुलझाडे आहेत. या बागेत छोटे लॉन केले आहे. त्याचबरोबरीने बोन्सायही केलेले आहे. बंगल्याच्याकडेने केशर आंबा, चिकू, सीताफळ, पेरू, नारळ इ. फळझाडांची लागवड केली आहे. गच्चीवर गुलाब व भाजीपाला लावलेला आहे.
फळझाडे, भाजीपाला, फुलझाडांना आम्ही सेंद्रिय खतेच वापरतो. बंगल्याच्या शेजारी उंच इमारती झाल्यामुळे घराभोवतीच्या बागेत ऊन कमी येऊ लागले. त्यामुळे आम्ही गेल्या दहा-बारा वर्षांपासून गुलाब व भाजीपाल्याची लागवड गच्चीवर करू लागलो.
भाजीपाल्यासाठी तीन फूट लांब, तीन फूट रुंद व केवळ सात इंच (दोन विटा) एवढ्याच उंचीचे वाफे बनविले आहे. या वाफ्यामध्ये तसेच कुंडीत आले, लिंबू, आंबेहळद, कांदा, लसूण, भुईमूग, शेवगा, बटाटा, घेवडा, वांगी, टोमॅटो, पालक, कोथिंबीर, आंबट चुका, मुळा, कढीपत्ता, मिरच्या, कोबी, फ्लॉवर, श्रावण घेवडा, मेथी, मोहरी, मका इ. सर्व भाज्या लावलेल्या आहेत. घोसाळे, दुधी भोपळा, कारले यांचे वेलही चांगले वाढले आहेत. यंदा कारले, आले, आंबेहळद व रताळ्याचे चांगले उत्पादन मिळाले. या वर्षी केवळ कारल्याच्या दोन वेलांवर 100 कारली लागली. परसबागेतील भाजीपाल्यामुळे घरच्या घरी ताजा भाजीपाला मिळतो. फळमाशीसाठी सापळा लावल्याने चांगला परिणाम दिसतो आहे.
सौ. आशा उगावकर,
पिंपळे निलख, पुणे

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20111126/5507413605321988189.htm