Friday, April 6, 2012

पशुवैद्यक विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हायजिन अँड पब्लिक हेल्थ, कोलकता येथे उपलब्ध असणाऱ्या मास्टर ऑफ व्हेटर्नरी पब्लिक हेल्थ (एमव्हीपीएच) या पशुवैद्यक क्षेत्रातील विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी - उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्‍यक शैक्षणिक पात्रता ः
अर्जदारांनी पशुविज्ञान अथवा पशुवैद्यक विषयातील पदवी परीक्षा - बॅचलर ऑफ व्हेटर्नरी सायन्स अँड ऍनिमल हसबंडरी यासारखी पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक गुणांकांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.

निवडप्रक्रिया ः
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येऊन लेखी निवड परीक्षेतील गुणांकांच्या आधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दोन वर्षे कालावधीच्या मास्टर ऑफ व्हेटर्नरी पब्लिक हेल्थ (एमव्हीपीएच) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी प्रवेश देण्यात येईल. अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक सत्राची सुरवात 1 जुलै 2012 रोजी होईल.

अर्ज व माहितीपत्रक ः
अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास विनंती अर्जासह ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हायजिन अँड पब्लिक हेल्थ, 110, सी. आर. ऍव्हेन्यू, कोलकता 700073 या पत्त्यावर लिहावे. यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी दूरध्वनी क्र. 033 - 22412860 वर संपर्क साधावा अथवा संस्थेच्या www.aihph.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ः
संपूर्णपणे भरलेले व आवश्‍यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज वरील पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2012 आहे. पशुवैद्यक वा पशुविज्ञान विषयातील पदवीधरांना याच क्षेत्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असेल, अशांनी या विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा अवश्‍य विचार करावा.

Source Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120403/5321235668092036782.htm