Monday, February 13, 2012

उन्हाळी हंगामात जनावरांची काळजी

15 फेब्रुवारीनंतर थंडी कमी होत जाते. पुढे दिवसाचा कालावधी वाढत जातो. सात मार्चनंतर तापमान वाढण्यास सुरवात होते. दहा मार्चनंतर ते वेगाने वाढतच जाते. एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता वाढते. या काळात जनावरांना सावलीची आवश्‍यकता असते. त्याचप्रमाणे पिण्याची पाण्याची गरजही वाढते. या सर्व बाबी हळुवारपणे घडत असताना जनावरांकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. गरजेनुसार हिरवा चारा आणि स्वच्छ पाणी जनावरांना पुरवावे.

Ref. links: http://www.agrowon.com/Agrowon/20120211/5672306917363612841.htm