Monday, February 13, 2012

सुरू उसाची लागवड ः

सुरू उसाच्या लागवडीसाठी सध्याचे हवामान उत्तम आहे. लागवडीसाठी 10 ते 11 महिने वयाचे बेणे निवडावे. बेणे पाच वर्षांतून एकदा बदलावे. बियाणे रसरशीत, निरोगी आणि जातिवंत असावे. को-86032 किंवा फुले 265 या जाती लागवडीसाठी उत्तम आहेत. कारण या जातींचा खोडवा उत्तम येतो. हेक्‍टरी 250 किलो नत्र, 115 किलो स्फुरद आणि 115 किलो पालाश द्यावे. यापैकी 25 किलो नत्र 115 किलो स्फुरद व पालाश लागवडीचे वेळी द्यावा. त्याबरोबर हेक्‍टरी 30 ते 40 बैलगाड्या किंवा 15 ते 20 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. सरी चार फूट रुंदीची असावी. एकरी दोन डोळ्यांची 10 ते 12 हजार टिपरी लागतील. डोळे दोन्ही बाजूस राहतील, अशा प्रकारे टिपरी सरीत लावावीत. मातीने ती झाकावीत किंवा सरीत पाणी देऊन टिपरी लावावीत.

Ref. link: http://www.agrowon.com/Agrowon/20120211/5672306917363612841.htm