Wednesday, November 30, 2011

पंधरवड्याचा डाळिंब सल्ला

1) मृग बहर ः 
1) पीक व्यवस्थापनात बागेला 17 ते 20 लिटर प्रति झाड प्रति दिवस याप्रमाणे पाणी द्यावे. 
2) बाग तणमुक्त ठेवावी व बागेतील पानफुटवे काढत राहावे. 
3) बागेतील रोगट फळे काढून नष्ट करावीत. 
पीक संरक्षण ः 1) तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास रोगट फळे काढून झाल्यावर लगेच बोर्डेक्‍स (0.5 टक्के)ची फवारणी करून घ्यावी. 2) रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास वरील फवारणीच्या सात दिवसांनंतर थायामेथोक्‍झाम (25 टक्के डब्ल्यू.जी.) 0.25 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. 

ब) हस्त बहर - 
1) बागेला 17 ते 20 लिटर प्रति झाड प्रति दिवस याप्रमाणे पाणी द्यावे. 
2) बागेतील पानफुटवे काढावेत व बाग तणमुक्त ठेवावी. 
पीक संरक्षण ः 1) बागेतील पानफुटवे काढून झाल्यावर, झाडाच्या मुख्य खोडांवर (10 टक्के) बोर्डेक्‍सचे मिश्रण + क्‍लोरोपायरिफॉस दोन मि.लि. प्रति लिटर याप्रमाणे झाडाच्या वयानुसार जमिनीपासून 30 ते 45 सें.मी.पर्यंत पेस्ट लावावी. 
2) पानांवर ठिपके दिसून आल्यास कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड (50 टक्के डब्ल्यू.पी.) 2.5 ग्रॅम प्रति लिटर + ब्रोनोपॉल 0.5 ग्रॅम प्रति लिटर तसेच रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास थायामेथोक्‍झाम (25 टक्के डब्ल्यू.जी.) 0.3 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. 

क) आंबिया बहर ः 
1) बाग ताणावर असू द्यावी. 
2) धारदार कात्रीने बागेची छाटणी करण्यापूर्वी कात्री सोडिअम हायपोक्‍लोराईडच्या द्रावणात बुडवून निर्जंतुक करून घ्यावी. 
3) छाटणी करताना झाडाचा आकार, फांद्यांची घनता विचारात घेऊनच छाटणी करावी. 
4) पेन्सिलच्या आकाराच्या फांद्या तशाच ठेवून उपफांद्यांचे शेंडे छाटावेत. 
5) मुख्य झाडावरील / फांदीवरील एक ते दोन इंच लांबीचे एकेरी काटे व सोटफाटे काढून टाकावेत. 
6) छाटणी करताना रोगट / तेलकट डागग्रस्त बाग छाटून आलेले मजूर किंवा कात्री निरोगी बागेत वापरू नये. 
7) छाटणी झाल्यानंतर सर्व कचरा लगेचच उचलून बागेच्या बाहेर नेऊन जाळावा. 
8) बागेतील ठिबक सिंचनाची स्वच्छता करून घ्यावी. 
पीक संरक्षण ः 1) छाटणी झालेल्या प्रत्येक फांदीवर, छाटलेल्या जागी (10 टक्के) बोर्डो मिश्रणाची पेस्ट करून लावावी, पेस्टचा सामू उदासीन करून घ्यावा. 2) सोडिअम हायपोक्‍लोराईट 2.5 मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे निर्जंतुक द्रावण बनवावे. 


Source link:  http://www.agrowon.com/Agrowon/20111128/5433855174707094694.htm